शिक्षण प्रसारासाठी सर्व स्तरावर व सर्व विषयांतर्गत शाळा, महाविद्यालये स्थापन करणे व चालविणे, साक्षरता मोहीम राबविणे, त्या संबंधित शैक्षणिक उपक्रमाची माहिती देणे यासाठी इतर शैक्षणिक संस्थांच्या अथवा स्वतः विविध उपक्रम राबविणे. शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सक्षमीकरणासाठी प्रयत्न करणे. उपयुक्त ज्ञान आणि, संग्रह, प्रचार, संवर्धन करणे.
समाजातील हुशार व होतकरू विद्यार्थ्यांना आवश्यक ती सर्व प्रकारची मदत करणे विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करणे. विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती सुरु करणे, मूकबधिर, कर्णबधिर, मतिमंद याच्यासाठी शाळा सुरू करणे. तसेच अत्यंत गरीब व आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांना दत्तक घेऊन वार्षिक शालेय खर्च करणे व इतर इतर मदत देणे. गरीब, होतकरू, हुशार मुलांना उच्च शिक्षणाची दारे खुली करून सक्षम करणे. जी मुल शिक्षणापासून वंचित आहेत त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे. विद्यार्थ्यांना शाळा, कॉलेज प्रवेशासंबंधी मार्गदर्शन व साहाय्य करणे.
संगीत, कला, नृत्य व मूक बधिर, अपंग, अंध, निराधार मुलांचे शिक्षण इत्यादी विषयक शिक्षण संस्था सुरु करणे. सदर संस्थेतील शाखांमधून मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू, संस्कृत, गुजराथी इ. भाषांमधून शिक्षण उपलब्ध करून देण्याची सोय करणे व विविध शैक्षणिक प्रकल्पांसाठी संशोधन व प्रशिक्षण संस्था सुरु करणे. तसेच विविध परकीय भाषांचे शिक्षण देणे.
सर्व माध्यमातील विद्यार्थ्यांसाठी आवश्यकतेनुसार गरुकुल, होस्टेल्स, बोर्डिंग, निर्माण करणे व विद्यार्थ्यांमध्ये मैदानी खेळाविषयी आवड निर्माण करून करून त्यांना प्रशिक्षण देणे, विविध स्पर्धा द्वारे प्रोत्साहन देणे.
वाचन संस्कृतीचा विकास करण्यासाठी ग्रंथालय सुरु करणे. तसेच व्याख्यानमालांचे आयोजन करणे. विद्यार्थ्यांना संस्था, शैक्षणिक संस्था, कॉलेज, शाळा, विद्यामंदिर इत्यादी वेगवेगळ्या प्रकारचे विद्यार्थी मदत निधी, बक्षिसे, अवार्ड्स, अलाउन्स, फेलोशिप, लेक्चर, प्रोफेसरशीप इत्यादी मार्गाने उपलब्ध करून घेणे इत्यादी.
सामाजिक व शैक्षणिक उपक्रम राबवणे. विद्यार्थी विद्यार्थी व युवकांचा सर्वांगीण विकास करणे साठी संस्कार करणे बौद्धिक वर्ग शिबीर भरवणे पर्सनालिटी डेव्हलपमेंट तसेच व्यवसायभिमुख प्रशिक्षण देण्याचा उपक्रम राबवणे गरजू विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शिका व अभ्यासिका चालवणे.
निसर्ग पर्यावरण दृष्टीकोनातून कृषी विकासाच्या विविध योजनांची माहिती शेतकऱ्यांना देणे. सेंद्रिय शेती गांडूळ शेती. मिश्रपीक निसर्गशेती मधुपालन याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणे. तसेच कृषिपूरक व्यवसाय कृषी प्रक्रिया उद्द्योग यासंदर्भात सुशिक्षित बेरोजगार ग्रामीण महिला अद्यावत प्रशिक्षण देणे. हरितगृह ठिबक सिंचन शेततळे, तुषार सिंचन, कृषी विषयक शासकीय योजना, अनुदान माहिती याबाबत मार्गदर्शन करणे मराठी किंवा इंग्रजी मधून कृषी विषयक नियतकालिके काढणे.
सदर न्यास तर्फे मेडिकल होमीओपॅथिक आयुर्वेदिक वेगवेगळ्या शैक्षणिक संस्था निर्माण करणे व चालविणे तसेच त्याकामी वेगवगेळ्या रिसर्च सेंटर डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट निर्माण करणे त्यासंबंधित शैक्षणिक उपक्रम राबवणे इत्यादी सर्व समाजातील सर्व घटकांना पेटंट रजिस्ट्रेशन करण्यासाठी संशोधनास सहाय्य करणे.
महिलांना खऱ्या अर्थाने सक्षम व स्वावलंबी बनवण्यासाठी त्यांना विविध गृहउद्योगाचे प्रशिक्षण देणे, महिलांचे विविध सामाजिक व सांस्कृतिक उत्सवांचे आयोजन करणे. त्यातून त्यांना समाजभिमुख बनविण्याचा प्रयत्न करणे व त्या अनुषंगाने महिलांकरिता विविध कार्यक्रम राबविणे गरीब गरजू विधवा निराधार स्त्रियांचे प्रश्न सोडवण्यासाठी मदत केंद्र, संस्कार केंद्र स्वयंरोजगार पुनर्विवाह, समजोता आश्रय व इत्यादि मार्गाने त्यांचे पुनर्वसन करणे, दीनदुबळे मूकबधिर, विकलांग कर्णबधिर अपंग व सामाजिक बहिष्कृत अश्या रोगाने पीडित असलेल्या लोकांसाठी वेगवेगळ्या मार्गाने मदत करणे तसेच त्यांच्या अन्न वस्त्र, निवारा, शिक्षण याकरीता मदत होईल अश्या प्रकारच्या संस्था उभा करणे अथवा अश्या संस्थांना संस्थांना मदत करणे. शैक्षणिक सहायता निधी देणे.
अनाथ व निराधार मुलांसाठी शिक्षण व आरोग्याबरोबर त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करणे व समाजातील दुर्लक्षित बेवारसपणे रस्त्यावर फिरणाऱ्या मुलांसाठी बहुऊद्देशीय संस्था स्थापन करणे व भटक्या मुलांसाठी निवारागृह सुरु करणे व गरज पडेल तेंव्हा व शक्य तेवढी आपत्कालीन मदत करणे व युवक संघटन निर्माण करून त्यांच्यात सामाजिक कार्याची आवड निर्माण करण्याचा प्रयत्न करणे भटक्या जमातीसाठी कार्य करणे.
झोपडपट्टीमध्ये निरीक्षर लोकांना साक्षर बनविण्यासाठी साक्षरता वर्ग चालविणे. झोपड्पट्टीवासियांच्या पुनर्वसनासाठी मार्गदर्शन करणे.
विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची निर्मिती व संयोजन करणे. नाटक, चित्रकला एकांकिका, पथनाट्य, वक्तृत्व, निबंध, वादविवाद, अभिनय, नृत्य, गायन, वंदन इ. चे प्रशिक्षण शिबिरे व स्पर्धा चे आयोजन करणे. ढोल लेझीम पथक सुरु करणे. सांस्कृतिक, कला, क्रीडा, युवा इ. स्पर्धा आयोजित करणे. गणेश उत्सव, गणेश जयंती, गणेश चतुर्थी, दहीहंडी, नवरात्र महोत्सव तसेच सर्व जयंती उत्सव साजरा करणे, गर्भ, दांडिया रस, रंगपंचमी, गोकुळाष्ठमी, दसरा महोत्सव इ. आयोजित करणे तसेच पुरस्कार, सन्मान, बक्षीस वितरण करणे. समाजामध्ये धर्मनिरपेक्षता, सर्वधर्म समभाव बंधुभाव व राष्ट्रप्रेम इ. भावना निर्माण करणे.
समाजातील गोरगरीब लोकांसाठी वैद्यकीय उपचार उपलब्ध व्हावेत म्हणून सार्वजनिक हॉस्पिटलची निर्मिती करणे. वैद्यकीय शिबिरे घेणे. त्याचबरोबर रुग्णवाहिका सेवा, शववाहिका सेवा उपलब्ध करून देणे, कुटुंब कल्याण कार्यक्रमाची माहिती देणे. आरोग्य केंद्रे, फिरते रुग्णालय, टेन बेड हॉस्पिटल इ. चालविणे, वैद्यकीय संशोधन केंद्र, नर्सिंग होम इ. चालविणे, चॅरिटी हॉस्पिटल ची माहिती देणे.
संस्थेमार्फत टेक्निकल, मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट सुरु करणे. त्यात विद्यार्थ्यांना यांत्रिक, तांत्रिक, औद्योगिक विषयावर सविस्तर मार्गदर्शन करणे. तसेच बेरोजगार तरुणांना नोकरी विषयक किंवा व्यवसाय विषयक मार्गदर्शन करून त्यांना रोजगार उपलब्ध करण्याविषयी माहिती पुरविणे.
शौचालय / सुलभ शौयालय व इत्यादी प्रकारची गावातील स्वच्छता या कार्यक्रमाचे अभियान राबविणे, स्वच्छतेचे महत्व गावातील लोकांना पटवून देऊन विविध मार्गदर्शन करणे, कचरा व्य्वस्थापण करणे.
आग, धरणीकंप, वादळ, अवर्षण वगैरे आपत्तीने त्रस्त झालेल्याना आर्थिक वैगेरे सर्व प्रकारची मदत करणे.
ट्रस्टचे उद्देश व त्यासंबंधी कार्यक्र्माची माहिती देण्यासाठी व त्यांचा प्रचार प्रसार करण्यासाठी वर्तमानपत्र, नियतकालिके, पुस्तके व इतर साहित्य प्रसिद्ध करणे.
दीनदुबळे, मूकबधिर विकलांग, कर्णबधिर, अपंग व सामाजिक बहिष्कृत अश्या रोगाने पीडित असलेल्या लोकांसाठी वेगवेगळ्या मार्गाने मदत कार्य करणे, तसेच त्यांच्या अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, याकरिता मदत होईल अशा प्रकारच्या संस्था उभ्या करणे अथवा अशा संस्थांना मदत करणे, शैक्षणिक सहाय्य्यता निधी देणे. जातीभेद संपवण्यासाठी सर्व महापुरुषांच्या विचारावर वाटचाल करणे इत्यादी...